मलेशियात साखरेचा खप कमी करण्याची मागणी

क्वालालंपूर : मलेशियातील लोकांमध्ये साखरेचा खप कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांतर्गत आरोग्यदायी भोजन आणि पेय उत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी कर कपातीची मागणी करण्यात येत आहे. न्यूट्रिशन सोसायटी ऑफ मलेशियाचे अध्यक्ष टी. ई. सिओंग यांनी सांगितले की, आरोग्यदायी उत्पादने करणाऱ्या कंपन्यांसाठी कर कपातीला सरकारच्या साखर खप कपातीच्या धोरणात्मक योजनेत समाविष्ट केले पाहिजे. या योजनेची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे. टी. ई. सिओंग यांनी सांगितले की, सरकारने केवळ पूर्वीच्या पॅकेज्ड आणि संसाधीत अन्न, पेय पदार्थांवरच लक्ष केंद्रीत करू नये तर फेरीवाल्यांचे स्टॉल्स, रेस्तराँसह भोजनालयात विक्री केल्या जाणाऱ्या अ-प्रक्रियाकृत वस्तूंचाही समावेश यात केला पाहिजे.

ते म्हणाले की, अनेक रेडी टू ईट भोजन आणि पेय पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात शर्करा असते. अन्न पदार्थातील साखरेचे प्रमाण सांगणे अथवा कमी करण्याचे निर्देश द्यावे, असा देशात असा कोणताही नियम नाही. टी. यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाची योजना व्यापक असली पाहिजे आणि आरोग्यदायी भोजन तयार करण्याच्या पद्धती तसेच भाजीपाला, धान्य, फळे यांच्या खरेदीला प्रोत्साहन दिले पाहिजे. कार्डियाक व्हॅस्क्यूलर सेंट्रल क्वालालंपूरच्या सल्लागार आहार विशेषज्ज्ञ मेरी ईसॉ यांनी सुचविले की, आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करणाऱ्या अन्न आणि पेय ऑपरेटर्सना त्यांच्या ऑपरेटिंग लायन्सच्या करात सवलत दिली पाहिजे. त्या म्हणाल्या की, आरोग्य मंत्रालयाने जे उत्पादक आपल्या उत्पादनात कमी साखरेचा वापर करतात, अशांना ओळखले पाहिजे. २०१९ मध्ये लागू केलेले साखर उत्पादन शुल्क तसेच सुरू ठेवले पाहिजे. आणि त्याची कठोर अंमलबजवाणी करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here