Philippines: साखरेच्या वाढत्या दराचा लाभ मिळविण्यासाठी ऊस उत्पादन वाढीचे प्रयत्न

मनिला: पुढील पिक हंगामात स्थानिक साखर उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. साखरेच्या वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या हंगामात अधिक प्रमाणात उसाची लागवड केली आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या (यूएसडीए) एका अहवालानुसार, पिक वर्ष २०२४ साठी स्थानिक साखर उत्पादन १.९ मिलियन मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. गळीत हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू होईल आणि पुढील वर्षी ऑगस्टमध्ये तो समाप्त होईल.

यूएसडीएने म्हटले आहे की, साखरेच्या वाढत्या किमतींनी शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यास अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. आणि चांगल्या खतांमुळे जास्त उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. मात्र, चालू वर्षासाठी यूएसडीएने आपल्या अनुमानीत स्थानिक उत्पादनाला २०,००० मेट्रिक टनाने घटवून १.८३ मिलियन मेट्रिक टन केले आहे. यांदरम्यान, सरकारने आतापर्यंत ४,४०,००० मेट्रिक टन रिफाईंड साखर आयातीला मंजुरी दिली आहे. स्थानिक बाजारपेठेत शुक्रवारी, रिफाईंड साखरेची किंमत एक वर्षापूर्वीच्या P७० प्रती किलोच्या तुलनेत P८६ ते P११० प्रती किलो आहे.

पुढील वर्षी उच्च उत्पादनानंतरही, फिलिपाइन्स ग्राहकांना स्थिर दरात साखर उपलब्ध करुन देणे आणि दोन महिन्यांचा बफर स्टॉक राखण्यासाठी जवळपास २,५०,००० मेट्रिक टन प्रक्रिया केलेली साखर आयात करेल, अशी शक्यता युएसडीएने वर्तवली आहे. सरकार स्थानिक उत्पादकांच्या सुरक्षेसाठी यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या दरम्यान कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी देईल, अशी शक्यता नाही. यूएसडीएला अशी अपेक्षा आहे की, फिलिपाइन्स व्यावसायिक वर्ष २०२४ मध्ये साखरेच्या किमतीमधील वाढ रोखण्यासाठी स्थानिक उत्पादनाला देशांतर्गत बाजारपेठ खुली करून देऊन तीन वर्षानंतर पुन्हा निर्यात सुरू करेल. फिलिपाइन्सकडून आपल्या निर्यात कोट्याच्या रुपात अमेरिकेला एकूण ६०,००० मेट्रिक टन टन साखर पाठवली जाते. अमेरिकेने फिलिपाइन्ससह इतर साखर उत्पादक देशांशी कमी टेरिफवर ठराविक प्रमाणात साखरेचा पुरवठा करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेशी एक सामंजस्य करार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here