ब्राझील जगातील सर्वात मोठा मक्का निर्यातदार बनण्याच्या मार्गावर

साओ पाउलो: ब्राझील लवकरच जगातील सर्वात मोठा मक्का निर्यातदाराच्या रुपात अमेरिकेला मागे टाकू शकतो. ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी ऊसासोबतच सोयाबीन आणि मक्का उत्पादनाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मक्का पिकाला ब्राझीलमध्ये “सफ्रिन्हा” म्हटले जाते आणि हे ब्राझीलमधील जादा उत्पादन होणारे दुसऱ्या क्रमांकाचे पिक आहे. मात्र, गेल्या एक दशकापासून या पिकाच्या उत्पादनामध्ये नवनवे विक्रम प्रस्थापित करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर यावर्षी याचे अपेक्षित उत्पादन उच्चांकी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्राजील अमेरिकेला मागे टाकून जगातील अग्रणी मक्का निर्यातदार देश बनू शकतो. अशी स्थिती यापूर्वी केवळ एकदा, २०१३ मध्ये निर्माण झाली होती. नॅशनल सप्लाय कंपनी (कॉनब)च्या या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नव्या रिपोर्टनुसार, मक्का उत्पादन १२४.९ मिलियन टन (गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.४ टक्के अधिक) होण्याची अपेक्षा आहे.

ब्राझीलमध्ये २०१७ पासून मक्क्यापासून इथेनॉल उत्पादन सुरू झाल्यानंतर मक्क्याच्या किमतीमधील वाढीमुळे उत्पादकांना “सफ्रिन्हा”मध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले. दुसऱ्या पिकाच्या रुपात मक्का शेतकऱ्यांना अधिक आकर्षित करू लागला आहे. संशोधित वाणांनी आता ब्राझीलमधील मक्क्याच्या सर्व शेतांवर आपला ताबा मिळवला आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ब्राझील यावर्षी ५२ मिलियन टन मक्क्याची निर्यात करू शकतो. २०२२ मधील ३१.९ मिलियन टनापेक्षा ती अधिक असेल. आणि त्यामुळे अमेरिका पहिल्या क्रमांकावरून खाली घसरू शकते. अमेरिकेची निर्यात ४९ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. ब्राझील, अमेरिकेचा स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. आणि उत्पादन आणखी वाढविण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. या पिकासाठी अद्याप खूप जमीन ब्राझीलकडे उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here