CGIAR च्यावतीने आयोजित कार्यशाळेत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी धोरणात्मक चर्चा

लखनौ : आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन सल्लागार समुहाद्वारे (CGIAR) मंगळवारी भारतीय ऊस संशोधन संस्थेमध्ये सीजीआयएआर तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

चर्चासत्रामध्ये सीजीआयएआरच्या जवळपास ६० कर्मचाऱ्यांसह देशभरातील संशोधन संस्था आणि हितधारकांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. हे सर्वजण जागतिक संघटनेशी जोडले गेले आहेत. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दक्षिण आशियाचे विभागीय संचालक डॉ. टेमीना ललानी-शरीफ होते. संशोधक आणि शास्त्रज्ञांनी बटाट्याच्या शेतीचा विस्तार, सिंचन प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करणे, पिकाच्या वाढीची गती साधण्यासाठी बियाण्यांच्या नव्या प्रजातीचे सादरीकरण यावर चर्चा केली. कृषी, कृषी शिक्षण तथा कृषी संशोधन राज्यमंत्री सूर्यप्रताप शाही हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

ललानी-शरीफ म्हणाले की, उत्पादकता हा आता मुद्दा नाही. ही पोषण सुरक्षेशी संबंधीत बाब आहे. यामध्ये सुधारणेची गरज आहे. आंतरराष्ट्रीय मक्का आणि गहू सुधारणा केंद्राच्या प्रतिनिधींनी बुंदेलखंडमध्ये जवसाच्या नव्या प्रजातींचे सादरीकरण आणि उच्च उत्पादन क्षेत्राला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी पिक सुधारणेसाठी तंत्रज्ञानाच्या वापराविषयी चर्चा केली. तज्ज्ञांनी वन-सीजीआयएआरच्या पैलुबाबतही माहिती दिली. हवामान बदलाच्या संकटामध्येही जमीन, भोजन आणि जल प्रणालीची उन्नत्ती आणि परिवर्तनसाठी विज्ञान आणि नव्या मार्गांच्या शोधावर यात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्थेच्या प्रतिनिधींनी सिंचनासाठी पुराच्या भूमिगत हस्तांतरणाबाबत चर्चा केली. याचा पायलट प्रोजेक्ट रामपूर (उत्तर प्रदेश) मध्ये सुरू करण्यात आला आहे. आयडब्ल्यूएमआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, युपीमध्ये कालवे, धरणे आणि तलावांचे नेटवर्क व्यापक आहे. त्यामुळे या योजनेच्या विस्ताराने राज्यातील दुष्काळ तसेच पुराशी लढा देता येऊ शकतो. तसेच भूजल नियंत्रित करणे शक्य आहे.

परिषदेत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, वर्ल्डफिश (जल अन्न प्रणाली अध्ययन करणारी एनजीओ) आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र, इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स, इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च इन अॅग्रो फॉरेस्ट्री आणि इतर अनेक जागतिक प्रतिनिधींनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here