कर वसुलीसाठी यंदा २० वर्षात सर्वात कमी खर्च, सरकारकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च

इन्कमटॅक्स विभागाचा कर वसुलीचा खर्च दरवर्षी कमी होत आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये हा खर्च एकूण जमा कराच्या जवळपास ०.५ टक्के राहिला. गेल्या दोन दशकांमध्ये हा सर्वात कमी खर्च कर वसुलीसाठी आला आहे.

इन्कमटॅक्स विभागाला कर आणि अर्थव्यवस्थेशी जोडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराने तसेच टॅक्स डिडक्टेड ॲक्ट सोर्स म्हणजेच टीडीएसच्या वाढत्या कार्यकक्षेमुळे खर्च कमी करण्यास मदत मिळत आहे. इन्मकटॅक्स विभागाकडील आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण कर वसुली १४.१२ लाख कोटी रुपये झाली. तर या वसुलीसाठीचा खर्च ०.५३ टक्के राहिला आहे.

एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काही वर्षापूर्वी इन्कमटॅक्स विभागाला कर वसुलीसाठी एकूण कर वसुलीच्या प्रमाणात जादा पैसे खर्च करावे लागत होते. आर्थिक वर्ष २०००-०१ मध्ये इन्कमटॅक्स विभागाला एकूण जमा कराच्या १.३६ टक्के रक्कम खर्च करावी लागली होती. तर आर्थिक वर्ष २०१५-१६ ते २०१९-२० या काळात एकूण कलेक्शनच्या ०.६१ टक्के ते ०.६६ टक्के रक्कमेचा खर्च यासाठी आला. तर कोविड महामारीच्या काळात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये हा खर्च थोडा वाढून ०.७६ टक्के आला होता.

सरकारकडील माहितीनुसार, इन्कमटॅक्स विभागाचा मुख्य खर्च कर्मचाऱ्यांचा पगार, प्रशासकीय कामे, आयटी एक्स्पेंसेस आणि तर गोष्टींवर करावा लागतो. एकूण जमा रक्कमेचा हिशोब पाहिला तर खर्चही वाढला आहे. २०१५-१६ मध्ये इन्कमटॅक्स विभागाने कर जमा करण्यासाठी ४,५९२ कोटी रुपये खर्च केले होते. तर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये हा खर्च वाढून ७,४७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर वसुलीतही मोठी वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये डायरेक्ट टॅक्स कलेक्शन ७.४ लाख कोटी रुपये होते. ते २०२१-२२ मध्ये वाढून १४.१२ लाख कोटींवर पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here