यूपी: शुगर मिल्स असोसिएशन आणि जागतिक बँकेमध्ये सामंजस्य करार

लखनौ : उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशन आणि जागतिक बँकेदरम्यान सुक्ष्म सिंचनावर एक सामान्य दृष्टिकोनातून आणि प्राधान्यक्रमानुसार दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी लखनौतील बीबीडी येथील हॉटेल फॉर्च्युन पार्कमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. बी. पटोदिया; डब्ल्यूआरजीचे देशाचे समन्वयक जित राधाकृष्णन, साखर उद्योग विभागाचे उद्यान तथा खाद्य प्रक्रिया संचालक डॉ. आर. के. तोमर आदींच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. जागतिक बँकेकडून अजित राधाकृष्णन आणि युपी शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने महासचिव दीपक गुप्तारा यांनी यावर स्वाक्षरी केली. यावेळी अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी प्रमुख उपस्थित होते. युपीएसएमए आणि डब्ल्यूआरजीने सुरू केलेल्या शेतकरी हिताच्या कामाबाबत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

डब्ल्यूआरजीने आपल्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत २०३० पर्यंतच्या ड्रिप इरिगेशनबाबत सादरीकरण केले. कार्यशाळेत मेसर्स गुजरात ग्रीन रिव्होल्यूशन कंपनी, अहमदाबादने सूक्ष्म सिंचन योजनेच्या विकासासाठी सिंगल विंडो डिलिव्हरी मॉडेलचे सादरीकरण केले. गुजरातमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आलेल्या आपल्या अनुभवांची माहिती दिली. राज्यात एकूण ३० टक्के पाणी बचत करण्यात ऊस उत्पादक शेतकरी सफल ठरल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here