सुदानमधील साखर कारखान्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील १७० जणांना घरवापसीची प्रतीक्षा

कोल्हापूर : सुदानमधील अस्थिर परिस्थितीमुळे तेथे रहात असलेल्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंसाचार अधिक भडकल्यास येथून सुरक्षितपणे बाहेर पडण्याती शक्यता कमी होत जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राजधानी खार्तुममध्ये सुदानी सेना आणि अर्धसैनिक दलांमध्ये संघर्ष सुरू असल्याने भारत सरकारने तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. सुनसान खार्तुमपासून जवळपास ४५० किलोमीटरवर लांब अंतरावरील व्हाइट नील राज्यात केनाना साखर कारखाना आहे. या कारखान्यात अनेक भारतीय कर्मचारी आहेत. यापैकी १७० हून अधिक महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यापैकी बहुतांश सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील आहेत. रस्ता मार्गे खार्तुम आणि साखर कारखाना यामधील अंतर किमान सहा तासांचे आहे.

केनाना साखर कारखान्यात काम करणाऱ्या भारतीयांना तेथून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. जर संघर्ष अधिक तीव्र झाला तर पोर्ट सुदानपर्यंत रस्तामार्गे प्रवास करणे कठीण बनेल. सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून खार्तुममधून ३३६ भारतीयांच्या पहिल्या तुकडीला बाहेर काढले आहे. खार्तुमपासून बाहेर पडल्यानंतर त्यांना लाल सागर पोर्ट सुदानमध्ये आणण्यात आले. त्यानंतर नौसेनेच्या जहाजांमधून सौदी अरेबियातील बंदराचे शहर जेद्दाह मध्ये आणण्यात आले. जेद्दा येथून त्यांना एअरलिफ्ट करून भारतात आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here