महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या सर्व भागात अवकाळी पाऊस पडत आहे. अकवाळी पावसाने राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह कोकणात खूप नुकसान झाले. मुंबई विभागीय हवामान केंद्राने पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा अंदाज जारी केला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. २८ एप्रिल रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारला यलो अलर्ट देण्यात आला आहे. २९ फेब्रुवारी रोजी अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत येलो अलर्ट आहे.

३० एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गढचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातही अवकाळी पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. एक मे रोजी विदर्भ, मराठवाड्यासाठी यलो अलर्ट आहे. कोकण वगळता इतर जिल्ह्यात पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here