NCP चे अध्यक्षपद सोडण्याची शरद पवार यांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (NCP) चे अध्यक्ष शरद पवार यांनी, आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत पवार यांनी म्हटले आहे की, आता राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी इतर कोणीतरी सांभाळावी असे मला वाटते.

शरद पवार यांनी अलिकडेच अशा प्रकारचे संकेत दिले होते. पवार यांनी म्हटले होते की, जर वेळेवर भाकरी फिरवली नाही, तर ती करपून जाते. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर आता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून १९९९ मध्ये NCP ची स्थापना केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here