केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे.
या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
“बंदरांच्या माध्यमातून झालेल्या विकासामुळे, भारत आता वाणिज्य तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.”
(Source: PIB)