हुमनाबाद : काँग्रेसने या विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले, तर भाजप त्यांच्या समस्यांची प्राधान्यक्रमाने सोडवणूक करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये जाहीर सभेत केले. काँग्रेस आणि जेडीएस शेतकऱ्यांचा द्वेष करतात. ते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काहीही करीत नाहीत. भाजपने सत्तेवर आल्यानंतर लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि इतर संबंधीत योजनांचा लाभ द्यायला सुरुवात केली, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात देशात केवळ ४०० मिलियन लिटर इथेनॉलचे उत्पादन होत होते. तर आमच्या सरकारने याचे उत्पादन ४,००० मिलियन लिटरपेक्षा अधिक केले आहे.
ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणात वाढीचा खूप लाभ झाला आहे. काँग्रेसने कधीही गरीबांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. त्यांनी कधीही गरीबांकडे पाहिले नाहीत. मोदी म्हणाले की, काँग्रेस असा पक्ष आहे, जो विकासतही राजकारण करतो. आडकाठी आणतो. मोदी म्हणाले की, जोपर्यंत कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार होते, त्यांनी गरिबांसाठी घरे बांधण्याची गती संथ केली. ते म्हणाले की, डब्बल इंजिन सरकार स्थापन केल्यानंतरही असा निर्णय घेतला की, कर्नाटक गरीबांसाठी नऊ लाखांचे पक्के घर देईल. मोदी म्हणाले की, आतापर्यंत काँग्रेस नेत्यांनी त्यांना ९१ वेळ्या वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या दिल्या आहेत. ते म्हणाले की, काँग्रेसने ज्या शिव्या मला दिल्या आहेत, त्यांची यादी मला मिळाली आहे. आतापर्यंत ९१ त्यांनी असे केले आहे. ते म्हणाले की, शिव्यांची डिक्शनरी बनविण्याऐवजी जर त्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांसाठी सुशासन राबवले असते तर त्यांची स्थिती इतकी दयनीय झाली नसती.