केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी सांगितले की, इथेनॉल क्षेत्राचा विकास सर्वोत्तम होत आहे. त्यामुळे जगासाठी हे एक प्रकारचे उदाहरणच आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाद्वारे आयोजित एक दिवसीय ‘मक्क्यापासून इथेनॉलवर राष्ट्रीय कार्यशाळे’ला संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षात, गेल्या हंगामात शेतकऱ्यांना ९९.९ टक्क्यांपेक्षा अधिक बिले देण्यासह साखर क्षेत्र आत्मनिर्भर बनले आहे.
ते म्हणाले, आता इथेनॉल मक्का उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थिरतेसाठी विकासात महत्वाचे ठरेल. हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा गुणात्मक परिणाम निर्माण झाला आहे. इथेनॉल सारख्या पर्यावरणासाठी अनुकूल इंधन पंतप्रधानांच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमात आहे, या गोष्टीवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. परिणामी केवळ २ वर्षात इथेनॉल मिश्रण दुप्पट झाले आहे. आणि २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्टही २०३० ऐवजी २०२५ पर्यंत करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, कालबद्ध योजना, उद्योगासाठी अनुकूल धोरणे, उद्योगाच्या सहकार्याबाबत भारत सरकारच्या पारदर्शक दृष्टिकोनाने या संधींना वास्तवात रुपांतर करण्यात आले आहे.
गोयल यांनी शेतकऱ्यांच्या हिताला नेहमी सर्वोच्च प्राधान्य देताना २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकार, राज्ये, संशोधन संस्था, इंधन वितरण कंपन्या (ओएमसी) आणि डिस्टिलरींच्या सामुहिक प्रयत्नांच्या गरजांवर भर दिला.