युपीतील ४९ जिल्ह्यात पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून पूर्ण उत्तर प्रदेशात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे. विभागाने बुधवारी राज्यातील ४९ जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी काही ठिकाणी पाऊस झाला.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी पश्चिमेकडील वातावरणाच्या प्रभावामुळे मंगळवारी उत्तर प्रदेशच्या विविध भागात पाऊस पडला. त्यामुळे वातावरण बदलून गेले. आयएमडीने सांगितले की, पाकिस्तानवर पसरलेल्या विक्षोभामुळे आणि राजस्थानमधील चक्रीवादळाचा परिणाम उत्तर प्रदेशवर झाला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात राज्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. शिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही रिमझिम पाऊस झाला.

राज्यातील बांदा, चित्रकूट, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर, प्रतापगढ, सोनभद्र, मिर्जापुर, चंदौली, वाराणसी, संत कबीर नगर, जौनपूर, गाजीपुर, आजमगड, मऊ, बलिया, हरदोई, फारुखाबाद, कन्नौज, कानपुर देहात, कानपुर नगर, उन्नाव, लखनऊ, बाराबंकी, राय बरेली, अमेठी, सुल्तानपुर, अयोध्या, अंबडेकर नगर, गाजियाबाद, हापुड, गौतम बुद्धनगर, बुलंदशहर, अलीगढ़, मथुरा, कासगंज, एटा, आगरा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, औरैया, बदायूं, जालौन, हमीरपूर, महोबा, झांसी, ललीतपूर आणि आसपासच्या भागात पाऊस कोसळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here