कृष्णा: अविसा फूड्स अँड फ्युएल (Avisa Foods & Fuels) आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील मल्लावल्ली फुड पार्कमध्ये ५०० केएलपीडी क्षमतेचे धान्यावर आधारित इथेनॉल युनिट स्थापन करण्याची योजना तयार करीत आहेत.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रस्तावित युनिट ४७.०५ एकर जमिनीवर उभारले जाणार आहे आणि यामध्ये १२.५ मेगावॅट सह-वीज प्रकल्पाचाही समावेश आहे. आंध्र प्रदेश राज्य गुंतवणूक संवर्धन बोर्डाने (SIPB) फेब्रुवारी २०२३ मध्ये या योजनेला मंजुरी दिली आहे. याशिवाय, १९ एप्रिल २०२३ रोजी कंपनीला योजनेसाठी पर्यावरण मंजूरी (ईसी) मिळाली आहे. याबाबत अद्ययावत अपडेटनुसार, कंपनी या योजनेवर जुलै २०२३ पर्यंत काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे.