पुणे : काही वर्षांपूर्वी आर्थिक तंगीचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील साखर उद्योगाची इथेनॉल उत्पादनात रुची वाढत आहे. राज्याने गेल्या काही वर्षांत आपली इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवली आहे.
महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने इंधन उद्योगातील उच्च मागणी आणि अधिक रिटर्नमुळे आपला व्यवसाय इथेनॉल उत्पादनाकडे स्थानांतरीत करीत आहेत.
हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, इथेनॉल मिश्रणासाठी इंधन उद्योगाकडून मागणी अधिक आहे. मात्र, सध्याचे कारखाने इथेनॉलचा गरजेइतका पुरवठा करण्यास सक्षम नाहीत. बहुतांश साखर कारखाने साखर उत्पादनाचा पर्याय स्वीकारण्याऐवजी उसापासून थेट इथेनॉल उत्पादनाकडे वळविण्यात आले आहेत. आम्ही ब्राझील मॉडेलचे अनुकरण करीत आहोत. आणि बाजारातील मागणीनुसार, ते आपल्या उत्पादनाला साखर आणि इथेनॉल यांदरम्यान वळवत आहेत. गायकवाड म्हणाले की, जर आम्ही गेल्या तीन वर्षांची तुलना केली तर असे म्हणून शकतो की, मागणी पुरवठ्यापेक्षा अधिक आहे. साखर कारखान्यांद्वारे २०२०-२१ मध्ये ८९.८१ टक्के, २०२१-२२ मध्ये ८५ टक्के आणि या वर्षी २०२२०-२३ मध्ये ३६.२३ टक्के इथेनॉलच्या मागणीचा पुरवठा करण्यात आला आहे. गायकवाड म्हणाले की, या वर्षी महाराष्ट्रात इथेनॉल क्षेत्रात १२,००० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.