मलेशिया: कारखाने सुरू झाल्याने पूर्व किनारपट्टीतील साखर पुरवठा पूर्ववत

सेपांग : एमएसएम मलेशिया होल्डिंग्सच्या जोहोर आणि पेराई पेनांग येथील बीएचडी साखर कारखान्यांच्या तात्पुरत्या बंदमुळे निर्माण झालेला पूर्व किनारपट्टीवरील साखरेचा तुटवडा दूर झाला आहे. आता साखर पुरवठा पूर्ववत झाला असल्याची माहिती देशांतर्गत व्यापार मंत्री दातुक सेरी सलाहुद्दीन अयुब यांनी दिली. हे कारखाने तात्पुरते बंद करण्यात आले होते. परंतु त्यांनी २५ एप्रिलपासून पुन्हा काम सुरू केले.

याबाबत मंत्री दातुक सेरी सलाहुद्दीन अयुब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, साखर पुरवठ्यातील टंचाई दूर करण्यासाठी एमएसएम मलेशिया आणि सेंट्रल शुगर्स रिफायनरी एसडीएन बीएचडी (CSR) या दोन स्थानिक साखर उत्पादकांशी मंत्रालयाने समन्वय साधला आहे. मला आशा आहे की संबंधीत भागातील नागरिकांची कोणतीही अडचण होणार नाही. साखरेच्या संभाव्य दरवाढीच्या दाव्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आजपासून घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना नव्याने साखरेचे वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विविध प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केलंटनमधील रहिवाशांनी २२ एप्रिलपासून राज्यात साखरेचा तुटवडा असल्याचा दावा केला होता. तर Kelantan KPDN चे संचालक अझमान इस्माईल यांनी सांगितले की राज्यातील अनेक सुपर मार्केटमध्ये सुमारे २,५०,००० किलो साखरेचे वितरण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here