जयपूर : सरकारी गहू खरेदीने पुन्हा एकदा गती घेतली आहे. यंदा उद्दिष्ट पूर्ण करण्यास उशीर होणार नाही, असे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. देशात गेल्यावर्षी १,०६० लाख टन गव्हाचे उत्पादन झाले होते. मात्र, यंदा तापमान नियंत्रणात राहिले असले तरी पावसाच्या फटक्याने गव्हाच्या प्रतवारीत फरक पडला आहे. तरीही उत्पादन सर्वत्रच वाढल्याचे दिसून येते.
पत्रिका मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धान्य व्यापारी के. जी. झालानी यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे राजस्थानमधील मंडयांमध्ये गव्हाची दैनंदिन आवक कमी झाली आहे. राज्यात बहुतांश गहू उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून येत आहे. राज्यातील मंडयांमध्ये सध्या गव्हाचा दर २००० ते २१०० रुपये प्रती क्विंटल आहे. जयपूर मंडईत कारखाना डिलिव्हरी दडा गहू २२०० रुपये प्रती क्विंटलने विक्री केला जात आहे.
सरकारी माहितीनुसार, आतापर्यंत १४.९६ लाख शेतकऱ्यांना ४१ हजार १४८ कोटी रुपये गहू विक्रीपोटी मिळाले आहेत. गव्हाची खरेदी १९५ लाख टनावर गेली आहे. तर गेल्यावर्षी १८७.८९ लाख टन खरेदी झाली होती. यंदा सरकारी गहू खरेदीचे उद्दिष्ट ३४१.५० लाख टन निश्चित करण्यात आले आहे.