ओडिशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हवीय राज्य सरकारकडून मदत

नयागढ : जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने उत्पादित गुळाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण, येथील ऊसामध्ये शुक्रोज (गोडवा) चे प्रमाण अधिक असते. आणि त्यामुळे हा गुळ देश आणि राज्याच्या इतर भागात उत्पादित पिकाच्या तुलनेत अधिक दर्जेदार असतो. मात्र, सरकारकडून कमी झालेली मदत, दर निश्चिती आणि नयागढ साखर कारखाना बंद झाल्याने ऊस शेतीला फटका बसला आहे.

तरीही काही शेतकरी अद्यापही ऊस शेती करीत आहे. रसायनांचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने त्यांनी गुळ उत्पादन सुरू ठेवले आहे. ऊस शेतीत मंदी असुनही केक आणि इतर विविध खाद्य पदार्थांमध्ये याच्या वापरामुळे लोगांमध्ये साखरेऐवजी गुळाची मागणी वाढत आहे.

नयागढच्या पानीपोयला मधील ऊस संशोधन केंद्राने जिल्ह्यात उत्पादित मोलॅसिससाठी जीआय टॅग मिळविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातून निश्चितच जिल्ह्यातील ऊस शेती आणि गुळ उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखाना बंद झाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. मात्र, अनेक शेतकरी मोलॅसिसच्या उत्पादनातून कमाई करतात. दर निश्चितीमधील अडथळ्यांमुळे गुळ व्यवसायावर परिणाम झाला असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. व्यापारी येथे ३३ रुपये प्रती किलो दराने गुळाची खरेदी करतात आणि त्याची विक्री ढेंकानाल, अंगुल, तालचेर, भुवनेश्वर आणि कटक आदी शहरात जादा दराने केली जाते. गावात एक किलो मोलॅसीस ४५ रुपये किलो या दराने विक्री केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here