भारतीय रेल्वेने एप्रिल 2023 मध्ये 126.46 MT इतक्या मासिक मालवाहतुकीची नोंद केली आहे. एप्रिल महिन्यात वाढीव माल लोडिंग 4.25 MT आहे. 2022 एप्रिल मधील मालवाहतुकीच्या तुलनेत त्यात 3.5% ची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये मालवाहतूकीतून मिळणारा महसूल 13,893 कोटी रुपये इतका आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात संकलित 13,011 कोटी रुपयांच्या तुलनेत, या मालवाहतुकीत 7% ची वाढ झाली आहे.
भारतीय रेल्वेने एप्रिल 2023 मध्ये 62.39 MT कोळशाची वाहतूक केली. तर, एप्रिल 2022 मध्ये ही वाहतूक 58.35 MT इतकी होती. त्याखालोखाल, 14.49 MT लोह खनिज, 12.60 MT सिमेंट, 9.03 MT शिल्लक इतर वस्तू, 6.7 4MT कंटेनर्स , 5.64 MT पोलाद, 5.11 MTअन्नधान्य, 4.05 MT खनिज तेल आणि 3.90 MT खतांची वाहतूक केली आहे.
मालवाहतुक वाढवण्याचे उद्दिष्ट घेऊन, भारतीय रेल्वेने त्यासाठी सातत्यपूर्ण आणि सक्रिय प्रयत्न केले आहे. त्यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे, परवडणाऱ्या दरात डिलिव्हरी सेवा देणे, अशा सगळ्या गोष्टींमुळे पारंपरिक मालवाहतुकीसोबतच, नव्या गोष्टींच्या मालवाहतुकीसाठी रेल्वेला पसंती देण्याचे प्रमाण वाढले आहे.