युपी: मुजफ्फरनगर जिल्ह्यात वाढले ऊस क्षेत्र

मुजफ्फरनगर : जिल्ह्यात ऊसाचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे. त्यापैकी ८५ टक्के जमिनीवर ऊस शेती केली जाते. यंदाही यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.

जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये १ लाख ७१ हजार २३६ हेक्टर क्षेत्रात ऊस पिके घेण्यात आले. त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये एक लाख ६८ हजार ७५ हेक्टर क्षेत्रात ऊस उत्पादन घेण्यात आले होते. अशाच पद्धतीने त्याआधीच्या वर्षात, २०२०-२१ मध्ये एक लाख ६४ हजार ३९१ हेक्टरमध्ये ऊस पिकविण्यात आला. २०१९-२० मध्ये जिल्ह्यात एक लाख ४७ हजार हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी ऊस पिक घेतले. त्याआधीच्या २०१८-१९ या वर्षात शेतकऱ्यांनी एक लाख ४२ हजार हेक्टरमध्ये ऊस शेती केली होती.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसाप, जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये ०२३८ या प्रजातीचा ऊस लोकप्रिय आहे. या प्रजाती पासून उसाचा उताराही जास्त मिळतो. त्यामुळेच जिल्ह्यात सातत्याने ऊस क्षेत्र वाढत आहे. साखर कारखान्यांनी यंदा उच्चांकी १०४.४७ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस लागवड क्षेत्र वाढत असल्याच्या माहितीला जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यांनी दुजोरा दिला. तर या पिकात नुकसानीचा धोका कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here