बांगलादेशचा साखर आयात करण्याचा निर्णय

ढाका : सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी १.१० कोटी लिटर सोयाबीन तेल आणि १२,५०० टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी खरेदीबाबत कॅबिनेट समितीच्या एका बैठकीत साखर खरेदीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

अर्थमंत्री एएचएम मुस्तफा कमाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पर्धात्मक बोलीअंतर्गत गुवेन ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड ऑफ इंडियाद्वारे सोयाबीन तेल प्रती लिटर १४६.१० टकावर खरेदी करण्याच्या टीसीबीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच सिंगापूरच्या स्मार्ट मॅट्रिक्स पीटीआय लिमिटेडकडून ८२.९४ टका या दराने १२,५०० टन साखर खरेदी करण्याच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली. महागाईचा भार सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी टीसीबी सवलतीच्या दरात साखर आणि खाद्यतेलाची विक्री करीत आहे.

टीसीबीकडून सोयाबीन तेल ११० टका प्रती लिटर आणि साखर ६० टका प्रती किलो दराने विक्री केली जाते. ४ मे नंतर स्थानिक रिफायनरींच्या मागणीमुळे स्थानिक बाजारात सोयाबीन तेलाच्या किमती आधीच्या १८७ टकापासून १२ टकाने वाढून १९९ टका प्रती लिटर झाल्या. गेल्या आठवड्यापासून साखर आधीच्या १२० टकाच्या तुलनेत १४० टका प्रती किलो दराने मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here