Alcochemagro Industries कडून नाशिक जिल्ह्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना

अल्कोकेमाग्रो इंडस्ट्रीजने (Alcochemagro Industries) नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील बल्हेगावात १०० केएलपीडी (klpd) क्षमतेचा एक इथेनॉल प्लांट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे.

याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अल्कोकेमाग्रो इंडस्ट्रिजचे हे प्रस्तावित युनिट ३१.०६ एकर जमिनीवर उभारण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये एक २.४ MW co-generation power plant स्थापन करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये अल्कोकेमाग्रो इंडस्ट्रिजला या योजनेसाठी पर्यावरणीय मंजुरी (ईसी) मिळाली आहे.

कंपनीने या योजनेसाठीचे डिझाइन आणि इतर अटींची पूर्तता केली आहे आणि कंपनी योजनेसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण करीत आहे. या युनिटच्या उभारणीचे काम जून २०२३ पासून सुरू केले जाईल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here