देशात साखर कारखाने १२ % इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टपूर्तीच्या अगदी जवळ

नवी दिल्ली : इंधन वितरण कंपन्यांनी (OMCs) इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) २०२२-२३ साठी केलेल्या ५१४ कोटी लिटरच्या करारापैकी ३० एप्रिलअखेर २३३ कोटी लिटर इथेनॉल मिळवले आहे. त्यामुळे त्यांना मिश्रण आधीच्या १० टक्क्यांच्या तुलनेत ११.६५ टक्क्यापर्यंत वाढविण्यास मदत मिळाली आहे. सध्याच्या ईएसवायमध्ये पेट्रोलसोबत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट १२ टक्के आहे. ते लवकरच पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

द हिंदू बिझनेस लाईनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तामीळनाडू वगळता देशातील उसाचे गाळप जवळपास संपुष्टात आले आहे. आणि आता डिस्टिलरी मोलॅसिसपासून इथेनॉलचे उत्पादन करतील. उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्याचा पर्याय आता संपुष्टात आला आहे. ओएमसींनी साखरेवर आधारित डिस्टिलरीजकडे ३७४ कोटी लिटर आणि धान्यावर आधारीत प्लांट्सकडून १४० कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचा करार केला आहे.

एक टन उसाच्या रसापासून थेट प्रक्रिया केल्यानंतर जवळपास ७०-७५ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जाते. तर एक टन बी हेवी मोलॅसीसपासून जवळपास ३२० लिटर इथेनॉल उत्पादन मिळते. उद्योगातील सुत्रांनी सांगितले की, साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून १३८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन आणि बी हेवी मोलॅसिसपासून ३२० कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्याबाबत करार केला आहे. केंद्र सरकारे २०२३-२४ हंगामासाठी इथेनॉल वर्ष नोव्हेंबरमधून ऑक्टोबरमध्ये बदलले आहे. चालू वर्षासाठी एका परिवर्तनाच्या रुपात हे वर्ष डिसेंबर ते ऑक्टोबर असे ११ महिने सुरू राहील आणि १२ टक्के मिश्रण ३१ ऑक्टोबरपर्यंत गाठले जाईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here