नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फेडरेशन (NFCSF) च्या म्हणण्यानुसार, देशातील सर्व ५३१ साखर कारखान्यांमध्ये ३० एप्रिल २०२३ पर्यंत ३२०.३० लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे. आणि NFCSF ने हंगामाच्या अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर उत्पादन होईल असे अनुमान वर्तवले आहे.
NFCSF च्या म्हणण्यानुसार, देशातील सरासरी साखर उताऱ्यात गुजरात सर्वात आघाडीवर आहे. देशात गुजरातचा सरासरी साखर उतारा १०.८० टक्के इतका असून हे राज्य सर्वात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक (१०.१० टक्के), तेलंगणा (१०.१० टक्के), महाराष्ट्र (१० टक्के), आंध्र प्रदेश (९.७० टक्के), बिहार (९.७० टक्के) आणि उत्तर प्रदेश (९.६५ टक्के) अशी क्रमवारी आहे.
NFCSF च्या अनुमानानुसार, गळीत हंगामाची सध्याची गती पाहता, देशात सध्याचा साखर हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहिल आणि यामध्ये जवळपास ३२७.३५ लाख टन साखर उत्पादन होईल, असे अनुमान आहे. त्याशिवाय, जवळपास ४५ लाख टन साखरेला इथेनॉल उत्पादनमध्ये डायव्हर्ट केले जाईल, असेही अनुमान आहे.