मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगर येथील टिकोला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६४० कोटी रुपये अदा केले आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही पैसे थकीत नसलेला हा राज्यातील पहिला साखर कारखाना आहे. त्यामुळे मुझफ्फरनगरातील शेतकऱ्यांचे चेहरे उजळून निघाले आहेत. कारखान्याने जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याने आपला गळीत हंगाम समाप्त झाल्यावर अवघ्या तीन दिवसातच शेतकऱ्यांचे सर्व पैसे दिले. अशा प्रकारची कामगिरी करणारा हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. तर जिल्ह्यातील भैसाना साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. जिल्ह्यात आठ साखर कारखाने आहेत. यामध्ये खतौली, टिकोला, मन्सूरपूर, तितावी, खाईखेडी, रोहाना, मोरना, भैसाना यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी यंदा ३५ अब्ज ४० कोटी ६८ लाख एक हजार रुपये किमतीच्या उसाचे उत्पादन केले. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ८३.८० टक्के म्हणजे २८ अब्ज ८६ कोटी २१ लाख २३ हजार रुपये दिले आहेत.
खतोली आणि मन्सूरपूर साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांन १४ दिवसांत बिले दिली आहेत. तर टिकोला साखर कारखान्याने संचालक निरंकार स्वरूप म्हणाले की, कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हंगाम सुरू होताच आम्ही ऊस बिलांचे नियोजन केले होते.