उत्तराखंड: कामगार टंचाईमुळे ऊस लागवडीत अडथळे

रुडकी : विभागात शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. जे मजूर उपलब्ध आहेत, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा मजुरी मागितली जात आहे. त्याचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होत आहे. छोटे शेतकरी यावर तोडगा काढत असते तरी कामगारांवर अवलंबून असलेल्या बड्या शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वर्षभरातील एप्रिल आणि मे महिन्यात शेतकरी जादा व्यस्त असतात. शेतकरी महक सिंह, गोरख सिंह, राजकुमार यांच्या म्हणण्यानुसार, पिकांची कापणी हा शेतीतील महत्त्वाचा टप्पा असतो. त्याचबरोबर पेरणी अर्थात पिकाची लागवडही महत्त्वाची असते. आता उन्हाळ्यातील ऊस लागणीची कामे सुरू आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याचे महिपाल सिंह, नाजर सिंह, बलविंदर सिंह यांनी सांगितले. यापूर्वी मजुरांना ४०० रुपये प्रती दिन दिले जात होते. आता काही मजूर कामाला तयार असले तरी ते प्रती दिन ६०० रुपये मागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here