कोळसा मंत्रालयाकडून कोळसा क्षेत्रातील संशोधन आणि विकासाचे प्रस्ताव आमंत्रित

कोळसा मंत्रालयाने शैक्षणिक संस्था आणि संशोधन संघटनांकडून संशोधनाचे प्रस्ताव मागवले आहेत. कोळसा क्षेत्रातील खालील विषयांवर संशोधन आणि विकासाचा भर असेल-

(i) जमिनीखालील खाणकाम आणि ‘ ओपन कास्ट’ खाणकामातील उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये सुधारणा करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान/ पद्धती,

(ii) सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण यात सुधारणा

(iii) कचऱ्यापासून संपत्ती

(iv) कोळशाचा इतर कारणांसाठी वापर आणि स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान

(v) कोळशाचा फायदा आणि वापर

(vi) शोध

(vii) नवोन्मेष आणि स्वदेशीकरण( मेक इन इंडिया संकल्पनेंतर्गत)

या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे, अर्जाचे स्वरुप आणि ऑनलाईन सबमिशनची सुविधा https://scienceandtech.cmpdi.co.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि हे प्रस्ताव पाठवण्यासाठी 15 जुलै 2023 ही अंतिम तारीख आहे.

अधिक माहिती/स्पष्टीकरणासाठी पुढील ठिकाणी संपर्क साधता येईल. US(CCT), Ministry of Coal on email: hitlar.singh85[at]nic[dot]in or GM(S&T), CMPDI(HQ), email:gmsnt.cmpdi@coalindia.in

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here