नव्या व्यापार आणि भागीदारी करारासाठी (टीईपीए) भारत आणि युरोपिअन मुक्त व्यापार संघटना यांनी उचलली आणखी पावले

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपिअन मुक्त व्यापार संघटनेचे नेते यांच्यातील चर्चेच्या समारोपात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातील मजकूर खालीलप्रमाणे आहे:

“भारत आणि युरोपिअन मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए -सहभागी देश आईसलँड, लिंचेन्श्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड) यांनी व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या (TEPA) दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. ब्रसेल्स येथे आता झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल ; स्विस फेडरल कौन्सिलर आणि आर्थिक व्यवहार, शिक्षण आणि संशोधन फेडरल डिपार्टमेंट प्रमुख गाय परमेलिन; जिनिव्हा येथे आइसलँडच्या स्थायी दूतावासाचे स्थायी प्रतिनिधी राजदूत आयनार गुन्नारसन; लिंचेन्श्टाईचे जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र,जागतिक व्यापार संघटना आणि ईएफटीए मध्ये स्थायी दूतावासाचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत,कर्ट जेगर आणि, नॉर्वेच्या व्यापार, उद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे विशेषज्ञ संचालक, एरिक अँड्रियास अंडरलँड यांनी सर्वसमावेषक टीईपीएच्या दिशेने काम करण्यासाठीच्या व्यवस्थेबाबत चर्चा केली. या दुसऱ्या मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी मागील आठवड्यात तज्ज्ञांच्या ऑनलाइन बैठका झाल्या होत्या.

भारत आणि युरोपिअन मुक्त व्यापार संघटना यांच्यातील व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारासंदर्भात वाटाघाटी पुढे नेण्यात मंत्रिस्तरीय बैठक एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. निष्पक्ष, न्याय्य आणि संतुलित करारासाठी विश्वास आणि एकमेकांच्या संवेदनशीलतेचा आदर करण्याच्या तत्त्वांवर चर्चा आधारित असण्याचे महत्त्व दोन्ही बाजूंकडून अधोरेखित केले गेले. भारत आणि ईएफटीए यांच्यातील टीईपीए लक्षणीय आर्थिक फायदे होऊ शकतात. जसे की एकात्मिक व लवचिक पुरवठा साखळी आणि दोन्ही बाजूंच्या व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होऊन व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढ होऊ शकते.

टीईपीएशी संबंधित महत्तवपूर्ण मुद्द्यांवर सामायिक सामंजस्यासाठी येत्या काही महिन्यांत आणखी अनेक बैठका नियोजित करून प्रयत्न वाढवण्यास आणि त्यांची चर्चा नियमितपणे सुरू ठेवण्यास प्रतिनिधीमंडळाने सहमती दर्शवली.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here