देशातील १६ राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील स्थिती

भारतातील इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात. गेल्या एक वर्षापासून देशात इंधन दर स्थिर आहेत. मात्र, राज्यांच्या स्तरावरील विविध कर काही शहरांतही वेगवेगळे असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. आज, मंगळवारी राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या दरात चढउतार सुरू आहे. कच्च्या तेलाच्या किमती ७५ डॉलर प्रती बॅरलवर आल्या आहेत. ब्रेंट क्रूड ७५.७५ डॉलर बॅरल आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूड ७१.५८ डॉलर प्रती बॅरल आहे. तरीही भारतीय बाजारात किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here