इथेनॉलवर फोकस: मक्का उत्पादन दुप्पट करण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे लक्ष्य

लखनौ : खाद्यतेपासून ते औद्योगिक वापरापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीत मक्याच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश सरकारने पुढील ४-५ वर्षात मक्याचे उत्पादन १.४७ दशलक्ष टनांवरून २.७५ दशलक्ष टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात इथेनॉलच्या मागणीसह पोल्ट्री क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षात देशांतर्गत मक्का उत्पादन १० मिलियन टनांनी वाढविण्याची गरज आहे. २०२२-२३ (जुलै-जून) मध्ये मक्का उत्पादन गेल्यावर्षीच्या देशांतर्गत उत्पादित ३३.७ मिलियन टनाच्या तुलनेत ३४.६ मिलियन टन राहील अशी अपेक्षा आहे.

याबाबत बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आता युपी सरकार मक्क्यावर आधारित पीक क्षेत्रांतर्गत उत्पादन वाढविण्याच्या दुहेरी रणनीतीवर काम करीत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, युपीमध्ये मक्क्याचे लागवड क्षेत्र सध्याच्या पेरणीच्या हंगामात १,७१,००० हेक्टरच्या तुलेत १,९३,००० हेक्टर झाले आहे. रब्बी आणि खरीप हंगामदरम्यान उन्हाळ्याचा शेतीचा कालावधी जायद म्हणून ओळखला जातो.

भारतात भात आणि गव्हानंतर मक्का हे तिसरे सर्वात महत्त्वाचे पिक आहे. त्याचा एकूण अन्नधान्यातील वाटा १० टक्के आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा मक्का उत्पादक आहे. जागतिक उत्पादनाच्या २.५ टक्के मक्याचे उत्पादन येथे केले जाते. युपी सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या रोड मॅपसह राज्य सरकार मक्का, मोहरी, डाळींसह अपंरपरागत पिकांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करीत आहे.

उत्तर प्रदेशात विविध पिक हंगामात मक्का लागवड क्षेत्र २०२१-२२ मध्ये जवळपास ६,१९,००० हेक्टर होते. मात्र, राष्ट्रीय सरासरी २६ क्विंटलच्या तुलनेत प्रती हेक्टर उत्पादन २१.६३ क्विंटल आहे. तामिळनाडूमध्ये उत्पादनाची सरासरी ६० क्विंटलपेक्षा कितीतरी अधिक आहे. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात प्रती हेक्टरी उत्पादन १०० क्विंटलपर्यंत पोहोचू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here