नवी दिल्ली : अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी जैवइंधनाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी G२० देशांनी एकत्र काम करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे (MoPNG) सचिव पंकज जैन यांनी सांगितले. जैन मंत्रालयाद्वारे आयोजित ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ सेमिनारमध्ये मुख्य भाषण देत होते. ही बैठक तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप मिटिंगसोबत आयोजित करण्यात आली होती. त्यांनी स्वच्छ ऊर्जा स्रोतांच्या संक्रमणामध्ये जैवइंधनाचे वाढते महत्त्व, त्यांचे विस्तृत अनुप्रयोग, तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता आणि निधीच्या संधी याविषयी वर्णन केले.
आर्थिक समृद्धी, ऊर्जा सुरक्षा आणि परवडण्याजोग्या जैवइंधनाचे योगदान लक्षात घेऊन जैन यांनी जागतिक जैवइंधन बाजाराच्या विकासाला गती देण्यासाठी G-२० देशांमधील सहकार्य वाढविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ऊस, मका, कृषी कचरा आणि बांबू यासारखे वैविध्यपूर्ण जैवइंधन फीडस्टॉकसाठी पर्याय उपलब्ध करून देणारी तांत्रिक प्रगती हे त्यांनी मांडली.
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA), टोटल एनर्जी, शेल, लॅन्झाटेक आणि SHV एनर्जी फ्युचुरियासह आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थांमधील प्रमुख खेळाडूंनी चर्चासत्रात भाग घेतला. जैव ईंधनाशी संबंधीत तंत्रज्ञान, उपयोग, भागीदारी आणि व्यावसायिक शक्यतांवर चर्चा करण्यात आली. सहभागींना शाश्वत एव्हिएशन फ्युएल (SAF) आणि अल्कोहल-टू-जेट फ्युएल ते बायोडिझेल, इथेनॉल उत्पादनासाठी कंप्रेस्ड बायोगॅस आणि नवीकरणीय डायमिथाइल ईथर (DME) यासारख्या विविध विभिन्न क्षेत्रांमध्ये जैव इंधनाची वाढती प्रासंगीकता स्वीकरण्यात आली आहे.