नवी दिल्ली : देशातील प्रख्यात मोटारसायकल कंपनी रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) नऑनबोर्ड डायग्नोस्टिक II (OBD२) नियमांनुसार आपल्या हंटर ३५० मोटरसायकलची डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली आहे, असे वृत्त बिजनेस स्टँडर्डने दिले आहे. ही मोटरसायकल E२० ईंधनावर चालू शकते.
नव्या Royal Enfield Hunter च्या ईंधन टँकवर ‘upto E20 पेट्रोल’ स्टिकर दिसून येतो. हा ई २० स्टिकर हटवण्याची सुविधाही आहे. कंपनीकडून आता विक्री केली जाणारी नवी मोटारसयाकल बीएस ६ च्या टप्पा २ मानदंडाचेही पालन करतील. हंटर ३५० मध्ये ३४९ सीसी, सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक इंजीन आहे. इंजिन एअर-ऑइल कुल्ड आहे आणि यामध्ये फ्युएल इजेक्शन तंत्रज्ञानही आहे. ही ६,१०० आरपीएमवर २०.११ बीएचपी आणि २७ एनएमचा जास्तीत जास्त टॉर्क आउटपुट निर्माण करते. मोटरसायकल पाच-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते.