मलेशिया: बाजारातील साखर पुरवठ्यावर सरकारची करडी नजर

कोटा किनाबालू : कामतान फेस्टिव्हल २०२३ दरम्यान, आज (२९ मे २०२३) पासून सात दिवसांसाठी मलेशियाची सरकारने बाजारातील साखर पुरवठ्यावर करडी नजर ठेवली आहे. सरकारने फेस्टिव्हल सिझनमध्ये मॅक्झिमम प्राइस कंट्रोल योजनेअंतर्गत साखरेसह आठ वस्तूंना सुचिबद्ध केले आहे. देशांतर्गत व्यापार मंत्री दातुक सेरी सलाहुद्दीन अयुब यांनी सांगितले की, कामतान फेस्टिव्हलदरम्यान सर्वसामान्य लोकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मोठ्या आणि रिफाईंड सफेद साखरेच्या बाजारातील सातत्यपूर्ण पुरवठ्यावर लक्ष दिले गेले आहे. साखरेची साठेबाजी करणाऱ्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

त्यांनी स्पष्ट केले की, व्यापार मंत्रालयाने ज्यांना थेटपणे रिफाईंड व्हाईट शुगरचे उत्पादन करण्यास अनुमती दिली होती, ते दर नियंत्रणाशिवाय साखरेची विक्री करू शकतात. गुरुवारी, सरकारने दोन स्थानिक साखर उत्पादक कंपन्यांना – एमएसएम मलेशिया होल्डिंग्स बीएचडी आणि सेंट्रल शुगर रिफायनरी एसडीएन बीएचडी (सीएसआर) ला क्लिअर रिफाइंड व्हाईट शुगरचे उत्पादन करण्यास परवानगी दिली, ज्याची किंमत बाजाराद्वारे निर्धारित केली जाईल. यामुळे ग्राहकांना विद्यमान मोठ्या साखरेला बारीक, शुद्ध आणि प्रक्रिया केलेल्या व्हाईट साखरेत बदलण्याचा पर्याय मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here