युपी: वादळ, अवकाळी पावसाचा परिणाम, हरदोईत गव्हाचा दर २३९० रुपये प्रती क्विंटलवर

कानपूर : गहू खरेदीसाठी सरकारी केंद्रांवर शांतता असली तरी खुल्या बाजारात गव्हाचे भाव झपाट्याने वाढू लागले आहेत. सोमवारी दुपारी कानपूरच्या घाऊक बाजारात गव्हाचा भाव २३५० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला. हरदोईत दर २३०० आणि फतेहपूरमध्ये २३५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हरदोईत दर २३९० रुपये तर फतेहपूरमध्ये २७०० -२८०० च्या स्तरापर्यंत पोहोचले होते. तर उत्तर प्रदेशात गव्हाचे सरकारी किमान समर्थन मूल्य २१२५ रुपये आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शासकीय केंद्रांवर गव्हाची खरेदी या भावात केली जात आहे. मात्र काही भागात पावसाने दडी मारल्याने गव्हाचा दर्जा आणि उत्पादन घसरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी गव्हाची साठवणूक केली आहे. यंदा राज्यासह देशात अनेक ठिकाणी हवामान बदलाचा फटका बसला आहे.

पाऊस आणि वादळाचा परिणाम पिकांवर झाला आहे. गव्हाचे उत्पादन फतेहपूरमध्ये ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते. सरकारी खरेदी केंद्रे रिकामी पडली असली तरी शेतकऱ्यांना बाजारात २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. यात मध्यस्तांची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. उन्नावमध्येही गव्हाचे उत्पादन घटले असून शेतकरी आणि मध्यस्तांमध्ये २२७५ रुपये प्रती क्विंटल दराने सौदे केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here