फिजीमध्ये ३०,३०६ हेक्टर ऊस क्षेत्र घटले: रिपोर्ट

सुवा : फिजी शुगर कॉर्पोरेशनद्वारे सादर करण्यात आलेल्या २०२२ च्या अहवालानुसार जवळपास ३०,३०६ हेक्टर ऊस क्षेत्र कमी झाले आहे. हा आकडा वित्त मंत्रालय, राष्ट्रीय विकास आणि सांख्यिकीद्वारे जारी आधारभूत धोरणात्मक पत्रानुसार आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, अवैध उप-विभाजन आणि शेतीयोग्य जमिनीचे निवासी तसेच वाणिज्यिक भूखंडांमध्ये रूपांतर करणे, अल्पकालीन कृषी पट्टे, दर पाच वर्षांनी त्यांची दरवाढ आणि खास करुन जमिनींच्या मालकी वादांमुळे ऊस लागवड क्षेत्रात घसरण झाली आहे.

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला साखर उद्योग, खास करून फिजीच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. तेव्हा याचे देशाच्या सकल उत्पादनात जवळपास ४ टक्क्यांचे योगदान होते. मात्र, साखर उद्योगाच्या अंतर्गत मुद्द्यांमुळे (अंतर्गत आणि बाह्य) फिजीच्या आर्थिक विकासात २०२१ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात केवळ १.१ टक्के योगदानासह खूप कमी झाले आहे.
अहवालात म्हटले आहे की, ऊसाचे उत्पादन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी होत आहे. आणि यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. यामध्ये उसासाठी जमिनीचा कमी वापर आणि कृषी योग्य जमिनीचे नुकसान, कामगारांचा तुटवडा, खराब होत चाललेली मातीची गुणवत्ता याचा समावेश आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांच्या अनुपलब्धता, रेल्वेच्या खराब पायाभूत सुविधा आणि रेल्वे गाड्यांची खराब स्थिती या अतिरिक्त बाबी यास कारणीभूत ठरतात. यासोबत पाणी व्यवस्थापन, पोषक घटकांचे अपुरे वितरण, हवामान बदलाचा परिणाम, खाऱ्या पाण्याची घुसखोरी, पाणी साठणारी शेते, खतांचे अयोग्य व्यवस्थापन यांसह जमिनीची तयारी, लागवड, खते तसेच अपुऱ्या यंत्रसामुग्रीचा वापर हे इतर घटक यास कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांची घटती संख्या, शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव, शहरी विकासासाठी उत्पादक जमिनीचे नुकसान, कारखान्यांची अक्षमता, हवामान बदल, कीड – रोग हे या उद्योगावर परिणाम करणारे इतर मुद्दे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here