मुझफ्फरनगर: भाकियूचे धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

बुढाना : शेतकऱ्यांना ऊसाचे सर्व पैसे देणे आणि विविध समस्यांची सोडवणूक करणे या मागण्यांसाठी भाकियूच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सलग दुसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन केले. तहसीलदार आणि विभाग विकास अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येवून समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत सर्व ऊस बिले दिली जात नाही आणि समस्यांची सोडवणूक होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आदोलनस्थळी तहसीलदार सतीश चंद्र बघेल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. त्यांनी आंदोलन समाप्त करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. विभाग विकास अधिकारी सतीश कुमार यांनी भाकियू कार्यकर्त्यांना सांगितले की, मोकाट जनावरांची समस्या लवकरात लवकर सोडवू. आमच्या स्तरावरील सर्व समस्यांची सोडवणूक लवकरच होईल. मात्र भाकियूचे अध्यक्ष अनुज बालियान यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली. यावेळी विकास त्यागी, हाकम अली, उमर दराज, विपिन, कृष्णदत्त त्यागी, सुधीर, प्रवीण, विपिन व अबरार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here