BPCL कडून वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलापासून विमान इंधन बनवण्यासाठी Sulzer शी चर्चा

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) टिकाऊ विमान इंधन (sustainable aviation fuel) क्षेत्रात भागिदारीसाठी स्वित्सर्लंडस्थित फ्लुइड इंजिनीअरिंग प्रमुख सुल्जर केमटेक (Sulzer Chemtech) सोबत चर्चा करीत आहे.

याबाबत लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, BPCL स्वयंपाकाच्या खाद्य तेलापासून {used cooking oil/स्वयंपाकासाठी वापरलेले तेल (UCO)} जेट इंधन (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल) विकसित करण्यावर काम करीत आहे. याला सर्वसाधारणपणे ‘युको-टू-एटीएफ’ (UCO to ATF) प्रक्रियेच्या रुपात ओळखले जाते.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, BPCL ने स्वयंपाकासाठी वापरलेल्या तेलाचा उपयोग करून शाश्वत विमान इंधनासाटी एक उत्प्रेरक विकसित केले आहे. याला यशस्वीपणे विकसित करण्यात आले असून ते प्रायोगिक टप्प्यात आहे. याचे सादरीकरण आणि व्यावसायिकपणे वापराकडे वळण्यासाठी, आता एक जागतिक व्यावसायिकासोबत भागिदारी करण्याचा विचार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here