यूपी: ऑनलाइन ऊस घोषणापत्र भरण्याची गती संथ

पिलिभीत : नव्या गळीत हंगामामध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन घोषणापत्र भरणे अनिवार्य आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने असे घोषणापत्र भरले नसेल तर त्याला साखर कारखान्याकडे ऊस पुरवठा करता येणार नाही. याबाबत निर्देश देण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांकडून ऑनलाइन घोषणापत्र भरण्याची गती संथच असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत सर्व्हे करणाऱ्या पथकांकडून जागृती केली जात आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात एक लाख हेक्टरमध्ये ऊस लागवड केली जाते. सहकारी समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. खते, बियाणे, कर्ज आदी सुविधा दिल्या जातात. गळीत हंगाम २०२३-२४ साठी सध्या उसाचा सर्व्हे सुरू आहे. मात्र, शेतकरी यासाठीचे घोषणापत्र भरण्याची ईच्छा दर्शवत नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील फक्त ५२३ शेतकऱ्यांनी घोषणापत्र भरले आहे. एक लाख शेतकरी संख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय नगण्य आहे. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्र यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये घोषणापत्राबाबत जागृती केली जात आहे. आगामी काळात संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here