सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या १८ जागा बिनविरोध

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांवर बिनविरोध निवड झाली. एकूण २१ जागांसाठी शिल्लक राहिलेल्या ४७ उमेदवारांपैकी १९ जणांनी माघार घेतल्याने १८ जणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता महिला गटातील 2 आणि इतर मागास वर्ग १ अशा तीन जागा बिनविरोध होणार कि नाही, याकडे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची अंतिम तारीख १३ जून आहे.

बिनविरोध झालेल्या १८ जागांमध्ये विद्यमान ८ संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकामध्ये विद्यमान चेअरमन, खासदार संजय मंडलिक, संभाजी ढोले, तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कुष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे, कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, विश्वास कुराड, प्रदीप चव्हाण, विरेंद्र मंडलिक, चित्रगुप्त प्रभावळकर, विष्णू बुवा यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here