नवी दिल्ली : BPCL नंतर आता देशातील सर्वात मोठी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेसुद्धा डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाची तयारी सुरू केली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि अशोक लेलँडने ED ७ (७ % इथेनॉलसोबत डिझेल मिश्रण) इंधनाचे प्रभावी परीक्षण करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. BPCL-R&D द्वारे विकसित ED७ ईंधन मिश्रणात ९३ टक्के डिझेल आणि ७ टक्के इथेनॉल आहे.
द इकॉनॉमिक टाइम्समध्ये पीटीआयच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तानुसार, इंडियन ऑईल आणि दोन देशांतर्गत इंजिन निर्मात्यांनी डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणावर काम सुरू केले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे संचालक (आर अँड डी) एस. एस. व्ही. रामकुमार यांनी सांगितले की, याच्या प्रयोगशाळेत आणि दोन इंजिनी उत्पादकांच्या संशोधन तथा विकास केंद्रात परीक्षण सुरू आहे. ऑटोमोबाइल उद्योग सियामद्वारे आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, दोन प्रमुख भारतीय डिझेल इंजिन निर्माते, इंडियन ऑइल आणि इतर इंधन वितरण कंपन्यांपैकी एक डिझेलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणावर सक्रिय काम करीत आहेत.
रामकुमार म्हणाले की, आम्हाला इथेनॉल मोठ्या प्रमाणात एकत्र करण्याची गरज आहे. जे १० टक्के मिश्रण २० टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आवष्यक आहे. २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रणासाठी १,००० कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. यासाठी इंधन उद्योग जोरदार आणि ठोस उद्दिष्टासह इथेनॉल उत्पादनाच्या बहुपर्यायी स्त्रोतांचा शोध घेत आहे. रामकुमार म्हणाले की, इथेनॉल खास करुन ऊसाच्या मोलॅसिसपासून मिळवला जातो. तर दुसऱ्या टप्प्यात इथेनॉल गव्हाचा भुसा, भाताचा भुसा, कापसाचा भुसा अथवा कृषी अवशेषांपासून मिळत आहे. पानीपत रिफायनरीमध्ये दुसऱ्या पिढीतील इथेनॉल प्लांटचे कामकाज यशस्वीपणे सुरू आहे.