कोल्हापूर : अखेर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. एकूण २१ जागांसाठी २१ अर्जच शिल्लक राहिले. ९ पैकी ६ जणांनी माघार घेतल्याने उर्वरित तीन जागाही बिनविरोध झाल्या. तत्पूर्वी १८ जागा बिन्व्रोध झाल्या होत्या. अर्ज माघारीची अंतिम तारीख १३ जून असून यादिवशी निवडणूक विभागाकडून कारखान्याच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.
विद्यमान ८ संचालकांना पुन्हा संधी मिळाली आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकामध्ये विद्यमान चेअरमन, खासदार संजय मंडलिक, संभाजी ढोले, तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कुष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे, कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान, पुंडलिक पाटील, विश्वास कुराड, प्रदीप चव्हाण, विरेंद्र मंडलिक, चित्रगुप्त प्रभावळकर, विष्णू बुवा, नेताजी बळवंत पाटील, नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे, प्रतिभा भगवान पाटील यांचा समावेश आहे.