ऊना : जिल्ह्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ला अत्याधुनिक इथेनॉल प्लांट स्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा प्रकल्प विभागाच्या अर्थव्यवस्थेत क्रांती आणेल. येथे रोजगार निर्मितीसह नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सज्ज आहे.
इथेनॉल प्लांटपासून जवळपास ३०० लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये कांगडा, हमीरपूर, बिलासपूर आणि राज्यातील इतर भागातील शेतकरी आणि नागरिकांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तांदूळ, ऊस आणि मक्क्यासारख्या कच्च्या मालाची विपुल उपलब्धता आहे. त्याचा लाभ घेत केलेल्या या प्लांटची स्थापना शेतकऱ्यांना सशक्त बनवेल आणि विभागातील आर्थिक स्थिरतेला बळ देईल. ही योजना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एचपीसीएलच्या संयुक्त प्रयत्नांनी राज्यातील शेतकऱ्यांना, रहिवांशांच्या भविष्यासाठी, कल्याणासाठी कटिबद्ध आहे.
चांगल्या रोजगाराच्या शक्यतेसह हा इथेनॉल प्लांट राज्यातील महसुलात एक महत्त्वपूर्ण योगदान देईल. राज्य जीएसटीच्या माध्यमातून या योजनेतून सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार या इथेनॉल प्लांटमध्ये ५० टक्के गुंतवणूक करून या उद्योगाप्रती आपली कटीबद्धता दर्शवली आहे. योजनेच्या कामकाजाला गती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला प्लांट उभारणीतील अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.