शामली : साखर कारखान्याने थकवलेल्या ऊस बिलप्रश्नी पंजोखरा जसला गावात पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याने बिले न दिल्याने ऊस पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंजोखराच्या जसाला मार्गावरील शिव मंदिरात आयोजित पंचायतीमध्ये शेतकऱ्यांनी ऊस थकबाकीबद्दल आपल्या समस्या मांडल्या. शामली साखर कारखाना सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी ऊस पाठविण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप बिले मिळालेली नाहीत. शेतकऱ्यांनी वारंवार थकीत बिलांबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मात्र, मे महिना संपला तरी पैसे दिले गेलेले नाही, असे सांगत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
जेव्हा शामली कारखाना उसाचे पैसे देईल, तेव्हाच ऊस पाठवला जाईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंचायत समाप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजपचे आमदार चौधरी विरेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यांना यावेळी झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली. विक्रम सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत झाली. कवरपाल, सोनू, सुरेश, संतरपाल, मदन, पद्मसिंह, पप्पन, सुशील आदी शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, साखर कारखान्याच्या गेटवरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहिले आहे.