महराजगंज : इंडियन पोटॅश लिमिटेड ग्रुपच्या सिसवा साखर कारखाना युनिटने चालू गळीत हंगाम, २०२२-२३ मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली आहेत. युनिट हेड आशुतोष अवस्थी आणि ऊस विभागाचे मुख्य व्यवस्थापक कर्मवीर सिंह यांनी ही माहिती दिली. साखर कारखान्याने गळी हंगामात २९.३० लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते. त्यापोटी शेतकऱ्यांना १०३ कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
लाईव्ह हिंदू्स्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संबंधीत समिती तथा ऊस विकास परिषदेचे अंशदान १.६१ कोटी रुपये पाठविण्यात आले आहे. सिसवा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वाढते तापमान आणि पाऊस न पडल्याने पिकांवर होणारा किड, रोगांचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्याकडून उपलब्ध होणारे कोराजन किटकनाशक वापरावे. सध्या कारखान्याचे ऊस सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी ऑनलाइन घोषणापत्र भरावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.