महाराष्ट्रातील कोल्हापुरात शुक्रवारी इंटरनेट सेवा अंशतः पूर्ववत करण्यात आली आहे. एका कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरून तणाव वाढल्यानंतर स्थानिक प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यातील इंटरनेट सेवा स्थगित केली होती.
परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित म्हणाले की, वादग्रस्त भागात परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, कोणताही मारामारीचा प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कोल्हापुरात बुधवारी दोन गटात झालेल्या हिंसक मारामारीच्या प्रकारानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला, त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला होता.