लखनौ : उत्तर प्रदेश जगभरात आपला गोडवा पसरवत आहे. गेल्या सहा वर्षात ऊस तोडणी पावती चोरी, काटामारीबद्दल आंदोलने केली जात होती. शेतकऱ्यांना नाईलाजाने आपल्या पिकाला आग लावावी लागत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सुधारणा लागू केल्या. त्यातून मोठा बदल झाला आहे. आता युपी ऊस तथा साखर उत्पादन, खांडसरी आणि इथेनॉल उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आता सेंद्रीय शेतीची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शनिवारी लोक भवनमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान केला. नवनिर्मिती भवन लोकार्पण कार्यक्रमात बोलताना त्यांनी सेंद्रीय शेतीची गरज अधोरेखीत केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आम्ही साखर कारखान्याच्या मालकांच्या समस्यांचे निवारण केले. आज प्रती हेक्टर २६४० क्विंटल ऊस उत्पादन करणारे शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सहा वर्षापूर्वी अधिकारी हे अशक्य असल्याचे म्हणत होते. आज ३१७१ महिला समुहांमध्ये ५९ हजार महिला काम करून राज्याच्या अर्थव्यस्थेत योगदान देत आहेत. ऊस विभाग दरवर्षी नवे काहीतरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट २,१३,४०० कोटी रुपये पोहोचविण्यात आले आहेत. १०० कारखाने सात ते दहा दिवसात ऊस बिले देत आहेत.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, अनेक सरकारे आली. मात्र, छपरौलीत आम्ही कारखाना सुरू केला. आज नवे कारखाने सुरू आहेत. कारखाने बंद पडत नाहीत आणि विक्री केले जात नाहीत.
साखर उद्योग तथा ऊस विकास मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी म्हणाले की, कोरोनामुळे पुरस्कारात अडचणी आल्या होत्या. सहा वर्षात योगी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादनात देश पहिल्या क्रमांकावर आहे. किटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी रोखण्याची गरज आहे. २० जिल्ह्यांतील शेती खराब होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीवर भर दिला जात आहे. यावेळी २० कारखान्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी उपस्थित होते.