आजरा साखर कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२१ मध्येच संपली आहे. कोरोना व अन्य कारणामुळे कारख्ण्याची निवडणूक लांबली होती. न्यायालयाने राज्य सरकारला सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० जून २०२३ पूर्वी घेण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. २५ मे २०२३ रोजी पक्की मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, संभाव्य पावसाचा धोका ओळखून निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केली होती. त्यानुसार आजरा शेतकरी साखर कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.आता पावसाळ्यानंतरच निवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here