कोल्हापूर : नरंदे (ता.हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखान्यात आगामी गळीत हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर म्हणाले कि, कारखाना प्रशासनाने आगामी गळीत हंगाम मागील हंगामाप्रमाणेच पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तयारी सुरु केली आहे. पाटील म्हणाले, कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार वेळेत दिले आहेत. शेतकरी आणि कामगारांमुळेच कारखान्याची यशस्वी घौडदौड सुरु आहे. ते म्हणाले, आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यात तांत्रिक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
यावेळी मौजे आगरचे सरपंच अमोल चव्हाण, कारखान्याचे संचालक सुभाषसिंग रजपूत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील – यड्रावकर, कारखान्याचे उपाध्यक्ष थबा कांबळे, आदित्य पाटील, आप्पासाहेब चौगुले, अजित उपाध्ये, युवराज शहा, विद्याधर कर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. आवटी, आर.बी. पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.