अति उष्णतेमुळे गव्हाच्या पिकासह जागतिक अन्न पुरवठा धोक्यात

ग्लोबल वॉर्मिंगचा अर्थ केवळ उन्हाळ्यातच उच्च तापमान असा नाही. याउलट, वर्षभर हवामान बदलत असून दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा अशा घटनादेखील त्यामुळेच दिसतात. हवामानातील एकूण बदलापैकी ग्लोबल वॉर्मिंग हा केवळ एक पैलू आहे. परंतु याचे परिणाम खूप मोठे आहेत. यापैकी एक मोठा परिणाम म्हणजे आपल्या अन्न पुरवठ्याची साखळी विस्कळीत होणे. हवामान बदलामुळे जागतिक अन्न पुरवठ्यासह जगातील गहू उत्पादनावर विपरीत परिणाम होणार असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आले आहे.

न्यूज १८ मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्रीडमन स्कूल ऑफ न्यूट्रिशन सायन्स अँड पॉलिसीच्या एका टीमने केलेल्या अभ्यासात या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अती तापमानाचा पिकांच्या उत्पादकतेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, असे अभ्यासात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. भारत आणि चीनसारख्या गहू उत्पादक देशांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल असे या संशोधनाचे प्रमुख लेखक एरीन कॉगलेन डी पेरेज यांनी म्हटले आहे.

जवळपास १०० वर्षांतून एकदा दिसणाऱ्या, सन १९८१ प्रमाणे उष्णतेच्या लाटा दिसू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. क्लायमेट अँड ॲटमॉस्फियरीक सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनात हवामान बदल गतीने सुरू असल्याचे म्हटले आहे. थंड हवामानात येणारे गहू पिक २७.८ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात दबावात येते. ३२.८ डिग्री तापमानादरम्यान हे पिक खराब होते. सध्या असे तापमान वारंवार दिसून येत असल्याचे आणि त्यातून पिकाचे नुकसान होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here