केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अतिरिक्त सचिव पदी रिचा शर्मा

नवी दिल्ली : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रिचा शर्मा यांची सुबोध कुमार सिंह यांच्या जागी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिचा शर्मा या 1994 च्या बॅचच्या छत्तीसगड केडरच्या IAS अधिकारी आहेत. तर, वरिष्ठ IAS अधिकारी सुबोध कुमार सिंह यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंह हे छत्तीसगड केडरचे 1997 बॅचचे IAS अधिकारी आहेत. रविवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

2015 मध्ये रिचा शर्मा यांना छत्तीसगड सरकारने अन्न खात्याची कमान दिली होती. 2018 मध्ये त्यांनी केंद्रीय सेवेसाठी अर्ज केला होता. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने अखिल भारतीय सेवेमध्ये कार्यरत 30 अधिकाऱ्यांची प्रतीनियुक्ती केली होती, ज्यामध्ये रिचा शर्मा यांचाही समावेश होता. 2019 मध्ये शर्मा यांची केंद्रीय पर्यावरण आणि वन विभाग मंत्रालयात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता शर्मा यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here